मग म्हणे गडिया आपण ।
130.
मग म्हणे गडिया आपण ।
उचलू चला गोवर्धन ।
तयातळी सकळही जन ।
घालुनिया संरक्षूं ॥१॥
मग ते उभे करुनि फेरी ।
धरविला त्यांचे हाते गिरी ।
आपणही तेथे निमित्यावरी ।
एकी आंगोळी लावियली ॥२॥
हाका देऊनि उचलीती ।
येकचि हिल्लारी करा म्हणति ।
उर मस्तक नेटी लाविती ।
एक पाठी देती निजबळे ॥३॥
एक पडोनिया उचलिती पाय ।
एक म्हणती न धरा रे भय ।
एक उभे राहती ठायाठाय ।
कृष्ण बळिया आमुचा ॥४॥
तव तो अनंतकोटीब्रम्हांडाधीश ।
परमात्मा हा कृष्ण परेश ।
विश्रवलाघवी परमपुरुष ।
न करी ते काय स्वलीला ॥५॥
आपोआप चालिला वरी ।
अंतरिक्षाची निज सत्ता गिरी ।
धरुनि सकळांते हाकारी ।
म्हणे वसा तळी याचीये ॥६॥
आपभयेंचि धावली सकळे ।
गाई गौळणी आणि गोवळे ।
निळा म्हणे श्रवापदे पक्षीकूळे ।
मुंगीया आदीकरुनी ॥७॥
