वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

मग पाचारुनिया प्रांत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089934 · अभंग क्र. १२४

124.
मग पाचारुनिया प्रांतवासी ।
व्दिज आणिले भोजनासी ।
जिताणे करुनिया श्रीकृष्णासी ।
ओंवाळिती अक्षवाणे ॥१॥
काळया सर्प स्थपिला वरी ।
कळंबातळी यमुने तिरी ।
देखोनि सोहळा तो नरनारी ।
करिती आश्चर्य मानसी ॥२॥
पहा रे हे श्रीकृष्णचरित्र ।
एकाहुनि एक विचित्र ।
नवलचि देखती आमुचे नेत्र ।
नित्यानित्य नूतन ॥३॥
हेचि घरोघरी वार्ता ।
कथिती कृष्णचरित्र कथा ।
गुढीया उभवूनीया चित्ता ।
माजी हर्ष न समाय ॥४॥
गाती नित्य नामावळी ।
तुळसी वृंदावना बैसोनि पाळी ।
अवलोकूनिया मुर्ति सावळी ।
करिती जिवे कुरवंडिया ॥५॥
म्हणती आमुचे थोर भाग्य ।
भाग्ये जोडला हा श्रीरंग ।
याचा नित्य घडता संग ।
काय करावे वैकुंठ ॥६॥
निळा म्हणे उत्साह ऐसा ।
मानूनिया निज मानसा ।
करिती पूजा स्तविती ईशा ।
जगत्रयाच्या श्रीकृष्णा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग