कैसा मी वानू कैसा मी
124.
कैसा मी वानू कैसा मी वानू । कैसा ध्याना आणू पांडुरंग ॥१॥
कैसी ते सेवा करू ते प्रकार । नव्हेचि अंतर स्थिर माझे ॥२॥
वारिता हे मन न येचि हाता । कितीसी हे चिंता करू आता ॥३॥
चोखा म्हणे येथे खुंटला उपाय । कैसेनि पाय आतुडती ॥४॥
