वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 14. विरहावस्था - अभंग ११९ ते १३८

समचरणी मन माझे वेधले

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087424 · अभंग क्र. १२५

125.
समचरणी मन माझे वेधले । ते वेगळें होता विरह बोले ।
हर्षामर्षा चित्त उन्मन ठेले । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥
सांवळीया कान्हया नको जाऊ दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी ।
पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥
तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामी असो अनुसंधान ।
शरण एका जनार्दने । काया वाचा मने जाणोन ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग