वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विधिहीन वर्ते वेदांस

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076092 · अभंग क्र. १२९

129.
विधिहीन वर्ते वेदांसी न मानी ।
श्रेष्ठ अव्हेरूनी वर्ततसे ॥१॥
तया दुर्जनासी नर्कयोनी जन्म ।
जाणावा अधम तमोगुणी ॥२॥
करितसे घात विश्वास देउनि ।
हिंसक अवगुणी मंदबुद्धि ॥३॥
अखाद्य भक्षण अचोष्य चोषण ।
अपेयाचे पान सुखे जया ॥४॥
न धरी भय मनी नरक होती मज ।
वर्तणे सहज पापबुद्धि ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा जाणा तमोगुणी ।
पडेल पतनी हीनमती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग