वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

भरते ना रिते आपण वसत

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090015 · अभंग क्र. १३१

131.
भरते ना रिते आपण वसते । सकळ जग होते तयामाजी ॥१॥
ते रूप पै ब्रह्म चोखाळ सर्वदा । नित्यता आनंदा नंदाघरी ॥२॥
आशापाश नाही घरी पूर्णापूर्ण । सकळ जग होणे एक्यारूपे ॥३॥
निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक । जेथे ब्रह्मादिक ध्याती सदा ॥४॥

अर्थ:
ज्या रुपा पासुन ह्या जगता पसारा पसरतो व त्या रुपात लय ही पावतो. ते स्वरुप आपल्या स्थानी कधी रिते व कधी भरते असत नाही. तेच ब्रह्म रुप सदा निर्दोष व आनंदरुप असुन सगुण श्रीकृष्ण रुपात नंदाच्या घरी आले आहे. त्यारुपाला कोणते ही आशापाश, पुर्णापूर्ता वगैरे नाही. सर्व जगताचे ऐक्य त्याच्यात सामावले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच रुपाचे सर्व ऋषी मुनी ध्यान करतात मी ही त्या नामसरोवराचा एक तट आहे

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग