माझे अचडे बचडे छकुडे
128.
माझे अचडे बचडे छकुडेंगे । राधे रूपडे ।
पांघरू घालिती कुंचडे ॥धृ॥
हरि माझा गे सांवळा । पायी पैंजण वाजे खुळखुळा ।
याने भुलविल्या गोपीबाळा ॥१॥
हरि माझा गे नेणता । करी त्रिभुवनाचा घोंगता ।
जो का नांदे त्रिभुवनी ॥२॥
ऐसे देवाजीचे गडी । पेंद्या सुदाम्याची जोडी ।
बळिभद्र त्याचा गडी ॥३॥
जनी म्हणे तू चक्रपाणी । खेळ खेळतो वृंदावनी ।
लुब्ध झाल्या त्या गौळणी ॥४॥
