वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

संवर्तक वर्षेल जळधार

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089816 · अभंग क्र. १२९

129.
संवर्तक वर्षेल जळधारी ।
तुवांहि झगटावे तव त्यावरी ।
ऐसे सांगोनिया प्रेरिले वरी ।
पांचहिजण अतिक्रोधे ॥१॥
आज्ञा होताचि चालिले मेघ ।
पवन त्याही पुढे सवेग ।
तेणे अभ्रे दाटली अनेक ।
पाडिला अंधकार गोकुळावरी ॥२॥
विजुवा चमकती लक्षवरी ।
कलपांत काळींच्या जैशा हारी ।
देखोनिया गजबज भारी ।
झाली गोकुली सर्व जना ॥३॥
म्हणती कालिचि याची इंद्रपुजे ।
विश्रवंसिले या नंदात्मजे ।
तेणेचि क्षोभोलिया सहस्त्रांबुजे ।
मेघ धाडिले गर्जती ॥४॥
आता जावे कोणीकडे ।
पळोनिया देवक्षोभापुढे ।
अकस्मात अरिष्ट हे एवढे ।
आणिले कृष्णे आम्हावरी ॥५॥
मागिल्या अरिष्टांत वांचला ।
तेणेचि बहूत वेळ घेतला ।
घात आमुचा येणे केला ।
गाईगोवळा समवेत ॥६॥
तव सुटला झुंजात वारा ।
मेघे घातल्या सरळ धारा ।
निळा म्हणे नंदकुमरा ।
करणे त्याचा अवमान ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग