गौळणी गार्हाणे सांग
131.
गौळणी गार्हाणे सांगती यशोदेसी । दही दूध खाऊनिया पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥
लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी सांगू किती महीपत्र सिंधु आटे ॥२॥
मेळवोनि गोपाळ घरांमध्ये शिरे कान्हा । धरु जाता पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥
ऐसे मज याने पिसे लावियेले सांगू काई । एका जनार्दनी कायावाचामने पायी ॥४॥
