वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

त्रिगुणाचे जाण शरीर

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076119 · अभंग क्र. १३०

130.
त्रिगुणाचे जाण शरीर वोतले ।
देही क्रिया चाले गुणापरी ॥१॥
म्हणउनिया साक्षी होय तू गुणाचा ।
मग तुज कैचा द्वैतभाव ॥२॥
त्रिगुणाचे भय ब्रह्मादिका असे ।
त्रिगुणाचे फासे घातकी हे ॥३॥
त्रिगुणसाकळी जीवासी जडली ।
तयाचेनि जाली बाधकता ॥४॥
त्रिगुणाचा सर्प झोंबला जयासी ।
मरण ते त्यासी आले खरे ॥५॥
बहेणि म्हणे गुण निवारील ऐसे ।
एक कृपा वसे सद्गुरूची ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग