वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सत्य साच श्रुति-धर्म

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076232 · अभंग क्र. १२७

127.
सत्य साच श्रुति-धर्मासी चालवी ।
तापसी तो दैवी संपत्तीचा ॥१॥
तो जाय स्वर्गासी सत्याचिया बळे ।
त्यागुनी सकळ कर्मपंथा ॥२॥
दयाक्षमा भूत-कृपा जयापासी ।
निष्कामनेसी शुद्ध बुद्ध ॥३॥
निश्चय सबळ अंगी जया धैर्य ।
वचनी माधुर्य अवंचन ॥४॥
संतोषी सर्वदा नुल्लंघुनी वेद ।
अंतरी आनंद सर्वकाळ ॥५॥
संताची संगती सद्गुरूसेवन ।
नाही दुजेपण जयामध्ये ॥६॥
वैराग्ये वर्तत प्रपंच्याचा साक्षी ।
आलियाचे रक्षी चित्त जो का ॥७॥
बहेणि म्हणे ऐसा स्वर्गा जाय नर ।
आत्मज्ञानशूर जाय मोक्षा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग