वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 67. यज्ञान्न मागण्याविषयी गोपास आज्ञा

यज्ञान्न मागण्याविषय

🙏 4. संत नामदेव · ABH-083845 · अभंग क्र. १२९

129.
यज्ञान्न मागण्याविषयी गोपास आज्ञा

प्रात:काळी सांगे सकळांसी कृष्ण । नका घेऊ अन्न आज कोणी ॥१॥
सोडोनिया गायी चालीले वनासी । गडी ह्लषी-केशी खेळताती ॥२॥
वर्जियले आम्हा नका घेऊ अन्ना । खावे काय कृष्णा आजी आता ॥३॥
गडीयांसी सांगे वैकुंठींचा राणा । सांगावे ब्राह्मणा जावोनिया ॥४॥
वनी उपवासी आहे रामकृष्ण । द्यावे त्यासी अन्न कृपा करोनी ॥५॥
गोपाळासी तेव्हा धाडी वासु-देव । पाहावया भाव याज्ञिकांचा ॥६॥
जोडोनिया हात वंदिती द्विजांसी । धाडिले आम्हांसी कृष्णनाथे ॥७॥
नामा म्हणे ऐसे सांगती गोपाळ । याज्ञिका सबळ अभिमान ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग