वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

नित्य निर्गुण सदा अस

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090129 · अभंग क्र. १२६

126.
नित्य निर्गुण सदा असणे गोविंदा । सगुणप्रबंधा माजि खेळे ॥१॥
ते रूप सगुण अवघेंचि निर्गूण । गुणि गुणागुण तयामाजि ॥२॥
अनंत तरंगता अनंत अनंता । सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥३॥
निवृत्ति परिमाण अनंत नारायण । सर्वाहि चैतन्य आपरूपे ॥४॥

अर्थ:
नित्य निर्गुण निराकार असलेला तो गोविंद सगुण साकार होऊन ह्या सृष्टीच्या निर्मितीचा खेळ खेळतो. सगुण रुपात असताना ही त्या परमात्यात गुणातीत मुळ स्वरुप कायम असते. जरी तो गुणातीत असला तरी त्याच्यात ते सर्व गुण भासतात. अनंत स्वरुप समुद्रात अनंत सृष्टीच्या निर्मितीच्या लाटा येतात व त्या लाटारुपी सृष्टीचा लय ही तिकडेच होतो पण त्या आशा सर्व सृष्टीचा पोषण कर्ता तोच असतो.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या व्यापक परमात्मा चे स्वरुप मोजायला ही अनंत परिमाणे लागतात व त्या नारायणात ते मुळ चैतन्य जीवनरुपात राहते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग