मग सांगे गडिया सुजाण
126.
मग सांगे गडिया सुजाणा ।
जाता कावडी हिरोनि आणा ।
काय करितो देवराणा ।
पाहो चरित्र देवाचे ॥१॥
से सांगोनिया गडियांसी ।
प्रात:काळींचि हषिकेशी ।
जाऊनिया मार्गप्रदेशी ।
रोखूनिया बैसला ॥२॥
तव ते लोक सकळही ।
स्नाने करुनिया लवलाही ।
वस्त्रे अळंकार घालुनी देही ।
वादये वाजवित सुस्वरे ॥३॥
करुनि सकळिका आरोळी ।
चला चला म्हणती उतावेळी ।
मग मिरवित कावडी कल्लोळी ।
नाचविताचि चालिले ॥४॥
वाणी पढती इंद्रप्रतापे ।
ठांई ठांई नाचती पडपे ।
सोहळा देखोनिया तो गोप ।
म्हणती कृष्णा अवलोकी ॥५॥
कैसा करीतुची हे गजर ।
आले अवघे नारीनर ।
तव कृष्ण म्हणे रे निर्भर ।
होऊनि लुटा कावडी ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि ऐसे ।
गोपाळ चौताळले आवेशे ।
म्हणती आणारे कृष्ण परे ईशें ।
कवडी इकडोचि आणविल्या ॥७॥
