आशा मनीषाचा विरह लाग
126.
आशा मनीषाचा विरह लागला । तेणे सांवळा दुरी ठेला ।
जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥
धांवे धावे कान्हई नंदनंदना । पुरवीं तू आमुची वासना ।
आणिक नको दुजी कल्पना । विरह निवारी देई दर्शना ॥२॥
छंदे छंदें विरहिणी बोले । का वो बोलण्या अबोलणें जाले ।
एका जनर्दनी ऐसे केले । नंदनंदना चित्त गुंतले ॥३॥
