बहुत जन्में विरहे पी
130.
बहुत जन्में विरहे पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥
चारी वाचा परता सावळा । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठे गुंतला । तेंणो आम्ही अबला वो ॥२॥
विरह जाईल कैशा परी । पुर्वपुण्या सुकृत पदरी । एका जनार्दनी भेटलें हरी । तै विरह नोहे निर्धारी ॥३॥
