शेटया झाला हरी । द्र
131.
शेटया झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारी ॥1॥
बुद्धि सांगे राजाईसी । तुह्मी न छळावे नाम्यासी ॥2॥
अवघ्या वित्तासी वेचावे । सरल्या मजपासी मागावे ॥3॥
विठ्ठलशेट नाम माझे । नामयाला सांगावे ॥4॥
आता उचित दासी । ऐसे बोले राजाईसी ॥5॥
ऐसे बोलोनिया गेला । म्हणे जनी नामा आला ॥6॥
