वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

निकट वेल्हाळ नेणो मा

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090011 · अभंग क्र. १२९

129.
निकट वेल्हाळ नेणो मायाजाळ । विव्हळ पाल्हाळ नेणो कांही ॥१॥
ते रूप श्रीधर मानवी अकार । सर्व निराकार सिद्धि वोळे ॥२॥
कुटूंब‍आचार कुळवाडी साचार । सर्व हा श्रीधर एका एक ॥३॥
निवृत्ति निगग्न गयनीच प्रतिज्ञा । नामे कोटि यज्ञा होतजात ॥४॥

अर्थ:
माया व परब्रह्म हे निकट आल्या शिवाय जगत उत्पन्न होत नाही तरी मायेचे मायिक गुण अविद्या, जडत्व, दुःख हे त्या व्यापक ब्रह्माला बंधन करु शकत नाही. ह्या पाल्हाळा पासुन ते मुक्त असते. त्या ब्रह्नरुपाने सर्व सिध्दी सह मानवी श्रीधररुपात अवतार घेतला आहे. ते ब्रह्म सर्वापासुन वेगळा एकटे दिसत असले तरी त्याने कुटुंब कबिल्या आचार साचार करुन दाखवला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी दिलेल्या प्रतिज्ञेमुळे मी त्या त्याच्या नामात रत असल्यामुळे मला कोटी यज्ञांचे फळ प्राप्त झाले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग