जिकडे पाहे तिकडे बां
132.
जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥
परी ते वर्म भज न कळे कांही । अधिंकचि डोही बुडतसे ॥२॥
एका पुढे एक पडती आघात । सारिता न सरत काय करूं॥ ॥३॥
चोखा म्हणे येथे न चलेंचि कांही । धांवे माझे आई विठाबाई ॥४॥
