खुंटले साधन तुटले बं
128.
खुंटले साधन तुटले बंधन । सर्वही चैतन्य एकरूप ॥१॥
नाही तेथे माया नाही तेथे छाया । निर्गुणाच्या आया ब्रह्मरूप ॥२॥
चैतन्य साजिरे चेतवी विचारे । आपरूपे धीरे विचरत ॥३॥
निवृत्ति म्हणे ते कृष्णरूप सर्व । रोहिणीची माव सकळ दृष्टि ॥४॥
अर्थ:
त्या एक रुप असणाऱ्या चैतन्यामध्ये अविद्ये बंधन नाही व साधक साधन साध्य ही त्रिपुटी ही नाही.त्या रुपाच्या ठिकाणी कोणते ही गुण व आकार नसुन भ्रम करणारे कोणतेही चिन्ह नाही.ते चैतन्य विचारांच्या चेतना जणुकाही पाणी होऊन संपुर्ण पृथ्वीवर पसरत (फिरत) आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात, ते जगताची सर्व रुपात हे तत्व आविष्कारले असले तरी हे जगत मृगजळा प्रमाणे मिथ्या असुन त्याचा लय त्याच रुपात निश्चित आहे.
