कोण माझा आता करील पर
125.
कोण माझा आता करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥
तू वो माझी माय तू वो माझी माय । दाखवी गे पाय झडकरी ॥२॥
बहु कनवळा तुझिया गा पोटी । आता नको तुटी करू देवा ॥३॥
चोखा म्हणे मज घ्यावे पदरांत । ठेवा माझे चित्त तुमचे पायी ॥४॥
