वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

समाधीचे साधन । ते रा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075063 · अभंग क्र. १२६

126.
समाधीचे साधन । ते रामनाम चिंतन ।
चित्ता सुखसंपन्न हर्ष । जीवन केला ॥
कोटी तपाचिया राशी । जोडती रामनामापाशी ।
नाम जपता अहर्निशी । वैकुंठपद पाविजे ॥
हेचि घुरूसी आठवले । उपमन्ये हेचि घोकिले ।
अंबऋषीने साधिले । रामकृष्ण उच्चारणी ॥
पांडवांसि सदा काळी । कृष्ण राहिला जवळी ।
ज्ञानदेव हृदयकमळी । तैसाचि स्थिरावला ॥

अर्थ :
रामनाम चिंतन हे समाधीचे साधन आहे. त्यामुळे चित्ताला सुख व जीवाला हर्ष झाला. रामनामाच्या जपाने कोटी तपाच्या राशी जोडता येतात. व हे नाम अहर्निश घेतले तर वैकुंठ प्राप्त होते. हे रामकृष्णनाम हे धृव व उपमन्यु ह्यांनी घेतले. ह्याच कृष्णनामाने तो पांडवापाशी राहिला व तसाच तो माझ्या हृदयकमळात तो स्थिरावला आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग