वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

अनंत सृष्टि घटा अनंत

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090100 · अभंग क्र. १२५

125.
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा । परिमाण पैठा आत्माराम ॥१॥
ते रूप साजिरे चतुर्भुजवेष । वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥२॥
सिद्धीचे साधन चिंतामणि धन । कल्पवृक्ष वन वसते जेथे ॥३॥
निवृत्तिचे मूळ गोपाळ सकळ । साधक दयाळ हरि होय ॥४॥

अर्थ:
अनंत सृष्टी अनंत देह व त्यांची अनंत घरे जरी वेगळी दिसत असली तरी परिणाम पाहिला तर त्यातील परमात्म तत्व एकच आहे. ते वैकुंठातील साजरे चतुर्भुजरुप नंदाच्या भाग्याने त्याला प्राप्त झाले आहे. त्याच परमात्माच्या ठिकाणी सिध्दीचे साधन, चिंतामणी चे धन व कल्पवृक्ष वन वसती करते निवृत्तिनाथ म्हणतात, माझे मुळ मी त्या गोपाळतच पाहिले व सर्व साधकांसाठी दयाळु हरि तेच स्वरुप आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग