येई वो श्रीरंगा कान्
131.
येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटले हृदयी । कोण सोडवील यांतुन पाही । दैवयोगें सांपडला सगुण देही ॥१॥
सगुण निर्गुण याचा वेध । वेधे वेधले मन झाले सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणे आणिक परमानंद ॥२॥
स्थित स्थित मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली समाधि उन्मनी स्थिरावला । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥
संगविवर्जित मन झाले । काया वाचा मन चित्त ठेले । एका जनार्दनी ऐसे केले । विरह दुःख निरसिले ॥४॥
