जन्मोजन्मीचे तुम्ही
130.
जन्मोजन्मीचे तुम्ही सांगाती । का हो मज घातिले भ्रांती ।
नाही कोठे सुख विश्रांति । पंढरीवांचोनी सर्वथा ॥१॥
विठोबा का न कळे तुम्हा । सर्व जगाचा तू आत्मा ।
पुराण पुरूष परमात्मा आम्हा दीना उपेक्षिसी ॥२॥
पाहा न्याय नाही तुमचे घरी । एका दु:ख एक राज्य करी ।
ऐसी नीत नव्हे बरी । साजे थार थोरपणे ॥३॥
चोखा म्हणे नवलाव । आमळा न कळे ठाव भाव ।
तुमचा कैसा घाव ढाव । कांहींच तो विठोबा ॥४॥
