वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

माझा कृष्ण देखिला का

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073256 · अभंग क्र. १३२

132.
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥धृ॥
हाती घेऊनिया फूल । अंगणी रांगत आले मूल ।
होते सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥
माथा शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण ।
त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥
संगे घेऊनि गोपाळ । बाळ खेळे आळुमाळ ।
पायी पोल्हारे झळाळ । गळा माळ वैजयंती ॥३॥
एका जनार्दनी माय । घरोघरांप्रती जाय ।
कृष्णा जाणावे ते काय । कोणी सांगा गे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग