वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

त्रिगुणापरते आहे तेच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076406 · अभंग क्र. १३१

131.
त्रिगुणापरते आहे तेची एक ।
भावने भाविक जाणती ते ॥१॥
सर्वांमाजी असे सर्वांही वेगळे ।
इंद्रिया नाकळे अखंडत्वे ॥२॥
आहे म्हणो तरी न दिसेच डोळा ।
नाही तो आगळा भास याचा ॥३॥
बहेणि म्हणे नाही नामरूप गुण ।
सर्वांठायी पूर्ण सदोदित ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग