वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

प्रेम जयांचे कथेवरी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075070 · अभंग क्र. १३१

131.
प्रेम जयांचे कथेवरी । तोचि धन्य ये चराचर ।
रामकृष्ण निरंतरी । मुखी आवडी जपतसे ॥
धन्य धन्य तोचि वंशी । धन्य धन्य माता कुशी ।
धन्य धन्य काळ तयासी । रामकृष्ण म्हणताचि ॥
ऐसे धन्य जन्म तयांचे । धन्य धन्य पुण्य साचे ।
त्यासी भय कळिकाळाचै । नाही जन्म घेतलिया ॥
एवढा महिमा नामाचा । धन्य जो राम उच्चारी वाचा ।
धन्य जन्म तयाचा । ज्ञानदेव म्हणे ॥

अर्थ :
ज्याचे हरिकथेवर प्रेम आहे जो रामकृष्णनामचा सतत उच्चार आवडीने करतो तो ह्या चराचरात धन्य आहे. रामकृष्णनामाचा उच्चार केला तर त्या वंश धन्य होतो, त्याची माता धन्य होते, त्याचा जीवनकाळ सुखमय होतो. त्याचा जन्म धन्य होतो, त्याला पुण्यप्राप्ती होते त्याला कळीकाळाचे भय उरत नाही व परत जन्म ही घ्यावा लागत नाही. येवढा महिमा एक नामचा असुन त्याचा जन्म रामनाम उच्चाराने धन्य होतो असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग