जयांचियासाठी जातो वन
131.
जयांचियासाठी जातो वनाप्रती । ते तो सांगाती येती बळे ॥१॥
जयांचियासाठी टाकिला संसार । ते तो बलवत्तर पाठी येती ॥२॥
जयाचिया भेणे घेतिले कपाट । तो तेणे वाट निरोधिली ॥३॥
जयाचिया भेणे त्यागियेले जग । तो तेणे उद्योग लावियेला ॥४॥
चोखा म्हणे नको होऊ परदेशी । चिंती विठोबासी हृदयामाजी ॥५॥
