वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कर्म करी देही धरूनी

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076231 · अभंग क्र. १२८

128.
कर्म करी देही धरूनी फलाशा ।
द्वैताचा वळसा जयापाशी ॥१॥
तयासी हा जाण प्राप्त मृत्युलोक ।
रजोगुणी एक वोळखावा ॥२॥
गर्व जयापाशी क्रोध सर्वकाळ ।
निद्रा ते जवळ ठेविलीसे ॥३॥
मोहाची साखळी सर्वकाळ कंठी ।
परस्त्रिया दृष्टी न्याहाळकु ॥४॥
आलियाने घरा इंद्राची संपत्ती ।
समाधान चित्ती नाही जया ॥५॥
पापिया निष्ठुर विषयांचा ध्यास ।
जया अविश्वास सर्वकाळ ॥६॥
चुंबक निंदक भूतमात्री द्रोहो ।
नाही निःसंदेहो चित्त ज्याचे ॥७॥
बहेणि म्हणे ऐसा वर्ते जो मानसी ।
मृत्युलोकी त्यासी देह घेणे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग