चोखियाचे घरा आले नार
25.
चोखियाचे घरा आले नारायण । होउनी ब्राह्मण दीने वृध्द ॥१॥
हातांमध्ये कांठी सांवळा जगजेठी । तुळसीमाळा क ठी बुका भाळी ॥२॥
कापत कापत जातसे चांचरी । मोठा नट धारी घरघेणा ॥३॥
चोखियाचे घर पुसतसे लोका । वैकु ठीचा सखा भ्त काजा ॥४॥
देरोनियांपाहे चोख्याची अंतुरी । तव तो आला द्वारी चोखियाच्या ॥५॥
हालस कापत मुखाने बोलत । लाळही गळत मुखावाटे ॥७॥
बंका म्हणे ऐसा पंढरीचा राणा । देखिला नयना सोयराई ॥८॥
