कुरंगिणी आपुली बालके
26.
कुरंगिणी आपुली बालके सांभाळी । तैसा वनमाळी आत्मालागी ॥
बहुत माझे लळे पुरविले सकळ । माउली कृपाळ अनाथांची ॥
उपकार सांगता नलगे आत पाहाता । सकल माझी चिंता दूर केली ॥
काये गा मी सांगो सांगता गा नये । सकाळ बाप माये पांडुरंग ॥
सर्वा परि माझी पुरविली आस । चुकविला गर्भवास बोधला म्हणे ॥
