तोडी हे बिरडे मोह मम
25.
तोडी हे बिरडे मोह ममता आधी । विषय बाधा व्याधी गुंफो नको ॥१॥
असे घराश्रामी भजे सर्वांभूती । मी माझे पुढती म्हणो नको ॥२॥
तु तव लटिका आलासी कोठून । मी माझे म्हणोनी म्हणतोसी ॥३॥
नामा म्हणे मूळ राम परब्रम्ह । जगाचा विश्राम त्यासी भजे ॥४॥
