वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

नुघडुनिया दृष्टी नाम

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090021 · अभंग क्र. २५

25.
नुघडुनिया दृष्टी नामा पाहे पोटी । आनंदाची सृष्टी तया जाली ॥१॥
घेरे नाम्या कवळु आनंदाचा होसी । तुजमाजी निवासी हरि आहे ॥२॥
नामा पसरी मुख आनंदाला तृप्त । कवळु पूर्णभरित हरिराज ॥३॥
निवृत्तिने सेविला कवळु हा हरि । तु च चराचरी दिससी आम्हा ॥४॥
आनंदात न्हालेले नामदेव डोळे उघडत नाहीत पण अंतर्मुख होऊन पाहतात तेंव्हा सर्व

अर्थ:
सृष्टी त्यांना आनंदाची भासते. निवृत्तिनाथ नामदेवांना भानावर आणुन काल्याचा घास घेण्यास सांगतात. हा एकात्म काला घेऊन तुझ्यात निवास करत असलेल्या परमात्माचे दर्शन घेण्यास सुचवतात. त्या आनंदात नामदेव आपले मुख पसरतात व देव त्यांना काल्याचा घास भरवतो.निवृत्तिनाथ म्हणतात देवांने त्या काल्याचा घास मला दिल्यावर ब्रह्मैक्य चराचराचे दर्शन मला एकत्वाने झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग