वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

एके दिवशी वाटे देखिल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076443 · अभंग क्र. २७

27.
एके दिवशी वाटे देखिले आपण ।
मंबाजीसी पूर्ण हेतयुक्त ॥१॥
नमस्कार करावया गेले तेथे ।
येरू हा न सिवे दूरी पळे ॥२॥
म्हणे तुम्ही काय कोण याती नेणो ।
आम्ही शूद्र म्हणो तुम्हालागी ॥३॥
सोनार की तुम्ही गोळक यातीची ।
तुम्हा ब्राह्मणाची क्रिया नाही ॥४॥
तुम्ही कोठे जाल भोजनासी जरी ।
दिवाणात तरी घालीन मी ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे ऐकोनी आपण ।
भ्रतारासी पूर्ण सांगितले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग