कर्म आणि धर्म आचरिजे
27.
कर्म आणि धर्म आचरिजे जयालागी ।
साधक शिणले साधन साधिता अभागी ॥१॥
गोड तुझे नाम विठोबा आवडते मज ।
दुजे उच्चारिते मना येत असे लाज ॥२॥
भुक्ति आणि मुक्ति नामापासी प्रत्यक्ष ।
चार्ही वेद साहि शास्त्रे देताती साक्ष ॥३॥
काया वाचा चित्त चरणी ठेवले गहाण ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥
