वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 5. गुरुवारचे अभंग

विश्रांतीचे स्थान सं

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073716 · अभंग क्र. २७

27.
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । ते या भूमीवर अलंकापुर ॥१॥
तये स्थळी माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनिया ॥२॥
सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ति । ब्रम्हज्ञान प्राप्ति वटेश्वर ॥३॥
चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥४॥
तयासी नित्यता घडता प्रदक्षणा । नाही पार पुण्या वास स्वर्गी ॥५॥
अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनी तीर्थराज ॥६॥
ऐशिया स्थळी समाधि ज्ञानदेव । एका जनार्दनी ठाव अलंकापुर ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग