विश्रांति सुखासि सुख
26.
विश्रांति सुखासि सुख पै जाहलें ।
ते उभे असे ठेले विटेवरी ॥१॥
डोळियांचे धनी पाहता न पुरें ।
गोळी ते साजिरे खेळविती ॥२॥
आगमा न कळे, निगमा वेगळे ।
गोकुळी लोणावळे चोरितसे ॥३॥
सांवता म्हणे ज्याचा न कळेचि पार ।
तो हरी साचार चारी गाई ॥४॥
