लक्षवरी बिल्वदळे माथ
26.
लक्षवरी बिल्वदळे माथा वाहे । आनंद न समाये महादेवा ॥१॥
बहुता काळाचे तेथे एक लिंग । होते भूमिभाग होऊ-निया ॥२॥
भोळा महादेव तेणे संतोषला । ह्मणे करी मला कोण पूजा ॥३॥
नामा ह्मणे पाहे निमित्याची वाट । पुराणी बोभाट असे त्याचा ॥४॥
