अवतारविचार भगवान आणि
24.
अवतारविचार भगवान आणि शेष यांचा संवाद.
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊ आता ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्हाणे सुरवर सांगू आले ॥२॥
शेष ह्मणे मज श्रम झाले फार । यालागी अवतार मी न घेचि ॥३॥
रामअवतारी झालो लक्षुमण । सेविले अरण्य तुह्मां-सवे ॥४॥
चैदा वर्षांवरी केले उपोषण । जाणता आपण प्रत्यक्ष हे ॥५॥
नामा ह्मणे ऐसे वदे धरणीधर । हांसोनी श्रीधर काय बोले ॥६॥
