भ्रतार गेलिया वैराग्
25.
भ्रतार गेलिया वैराग्य घेउनी ।
पांडुरंगा जनी जिणे काय ॥१॥
प्राणोविण देह काय पावे शोभा ।
रात्री विणप्रभा चंद्राचिये ॥२॥
भ्रतार तो जीव देह मी आपण ।
भ्रतार कल्याण सर्व माझे ॥३॥
भ्रतार जीवन मी मच्छ तयात ।
कैसेनी वाचत जीव माझा ॥४॥
भ्रतार तो रवी मी प्रभा तयासी ।
वियोग हा त्यासी केवी घडे ॥५॥
बहेणि म्हणे माझ्या जिवाचा निर्धार ।
बोले पै विचार हरी जाणे ॥६॥
