घेईन मी जन्म याजसाठी
26.
घेईन मी जन्म याजसाठी देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥
हरिनाम कीर्तन संतांचे पुजन । घालु लोटांगण महाद्वारी ॥२॥
आनंदे निर्भर असो भलते ठायी । सुखदु:खा नाही चाड आम्हा ॥३॥
आणिक सायास न करी न धरी आस । होईन उदास सर्वभावे ॥४॥
मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी । होय सांगो तैसी तुका म्हणे ॥५॥
