उठा जागे व्हा रे आता
26.
उठा जागे व्हा रे आता । स्मरण करा पंढरीनाथा ।
भावे चरणी ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ॥१॥
धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून ।
सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥
माया विघ्ने भ्रमला खरे । म्हणता मी माझेनि घरे ।
हे तो संपत्तीचे वारे । साचोकारे जाईल ॥३॥
आयुष्य जात आहे पाहा । काळ जपतसे महा ।
स्वहिताचा घोर वहा । ध्यानी राहा श्रीहरीच्या ॥४॥
संतचरणी भाव धरा । क्षणाक्षणा नामा स्मरा ।
मुक्ति सायुज्यता वरा । हेचि करा बापांनो ॥५॥
विष्णुदास विनवी नामा । भुलू नका भव कामा ।
धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६॥
मंगलाचरण पहिले दुसरे तिसरे काकडा भूपाळ्या वासुदेव
