बरा देवा कुणबी केलो
27.
बरा देवा कुणबी केलो । नाहींतरी दंभे असतो मेलो ॥१॥
भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ॥२॥
विद्या असती काही । तरी पडतो अपायी ॥३॥
सेवा चुकतो संताची । नागवण हे फुकाची ॥४॥
गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ॥५॥
तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमाने ॥६॥
