वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

जो वेदासी आकळ पुराणा

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075514 · अभंग क्र. २६

26.
जो वेदासी आकळ पुराणांसी वाड । तो उभा उभा असे उघड पंढरीये ॥१॥
भावाचा भुकेला भावाचा भुकेला । भावाचा भुकेला विठु माझा ॥२॥
लावण्यरूपडे तुळशीहार गळा । वैजयंती माळा रूळे कंठी ॥३॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले । ध्यानी मिरविले भाविकांच्या ॥४॥
चोखा म्हणे माझा सुखाचा निधान । वोवाळीन प्राण कुरवंडी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग