वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ५, काकड आरती अभंग

उठा उठा साधुसंत । सा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073156 · अभंग क्र. २५

25.
उठा उठा साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥१॥
उठोनि वेगेंसी । चला जाऊ राऊळासी ।
जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥२॥
उठोनिया पहाटे । विठ्‌ठल पाहा उभा विटे ।
चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टी अवलोका ॥३॥
जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा ।
वेगे निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥४॥
पुढे वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती ।
होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥५॥
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारी ।
केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥६॥
मंगलाचरण पहिले दुसरे तिसरे काकडा भूपाळ्या वासुदेव

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग