पुराणी पवाडे जयाचे अ
27.
पुराणी पवाडे जयाचे अपार । ऐकतांचि फार सुख वाटे ॥१॥
भोळा महादेव पाहे भोंळा भाव । एकसरे जीव उद्ध-राया ॥२॥
रावण मागो गेला पार्वतीकारणे । देते वेळे नेणे कैसे द्यावे ॥३॥
जातीची चांडाळी गोकर्णासी गेली । दरुशने ते नेली कैलासासी ॥४॥
नामा म्हणे कैसे दैव या भिल्लाचे । आले पूज-नाचे फल हाता ॥५॥
