वेदादिक श्रमले न कळे
24.
वेदादिक श्रमले न कळे जया पार । शस्त्रांसी निर्धार न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी नंदाचिया घरी । क्रीडे नानापरी गोपिकांसी ॥२॥ चोरावया निघे गोपिकांचें लोणी । सौगडें मिळोनी एकसरें ॥३॥ एका जनार्दनी खेळतसे खेळा । न कळे अकळ आगमनिगमां ॥४॥
