वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

निज ब्रह्मा ब्रह्म त

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074979 · अभंग क्र. २५

25.
निज ब्रह्मा ब्रह्म तो । ब्रह्नादिका वंद्य तो गे बाई ॥
अचिंतचिंतन तो । सारासार गुह्य तो गे बाई ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु तो । जनी वनी कृपाळ तो गे बाई ॥

अर्थ :
हे जीवरुप सखी, तो त्या भगवान ब्रह्म्याचा ब्रह्म आहे. व ब्रह्मादिकांना तोच वंदनिय आहे. तो अचिंतनाचे चिंतन तोच आहे. तो सारासार विचार करुन निघालेले गौप्य ( गीतेत गौप्याचे गुप्तधन गीतेला म्हंटले आहे ) आहे. तो सर्व चराचरावर कृपा करणारे रखुमाईचा पती व माझे पिता आहेत. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग