माध्यान्ह जालीया पाह
26.
माध्यान्ह जालीया पाहिजे ते अन्न ।
भ्रतार जाऊन ग्राम हिंडे ॥१॥
तव तेथे येक ब्राह्मण कोंडाजी ।
म्हणे ‘ तुम्ही या जी भोजनासी’ ॥२॥
भ्रतार बोलिला ‘ आहो पाचजण ।
इतुकियासी अन्न कोण घाली’ ॥३॥
येरु म्हणे ‘ तुम्ही आवघीच भोजना ।
यावे नारायणा काय चिंता ॥४॥
जावे स्थळ तुम्ही पाहोनी राहिजे ।
माध्यान्ही येईजे गृहाप्रती’ ॥५॥
बहेणि म्हणे आला भ्रतार, अन्नासी ।
मेळविले त्यासी सांगितले ॥६॥
